Sunday, March 3, 2013

नवशिक्षण आणि परम विद्यापीठ


नवशिक्षण आणि परम विद्यापीठ



शिक्षण ही प्रक्रिया सतत परिवर्तनशील असावी याबद्दल सर्व शिक्षण तज्ञांचे एकमत आहे. या परिवर्तनाचे स्वरूप संकल्पना कशा असाव्यात यावर मात्र त्यांचे कमालीचे मतभेद दिसतात.

महात्मा गांधी, डॉ. जे.पी.नाईक प्रा. राम ताकवले यांच्या शिक्षणाविषयी विचारांमध्ये एक समानता दिसते. ती समानता म्हणजे शिक्षणाचा उद्देश, समाजविकास हा असावा शिक्षणातूनच समाजाचे परिवर्तन होईल यांच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या तिन्ही महानुभावांनी आधुनिकतेची कास धरून तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रात व्हावा यासाठी त्यांच्या-त्यांच्या वेळी प्रयत्न केलेले दिसतात.

मागील वर्षी पुण्यात शिक्षण आणि समाजपरिवर्तन यासंबंधी MKCL ने एक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात प्रा. राम ताकवले यांनी नवशिक्षण परम विद्यापीठ या विषयावर सविस्तर मांडणी केली त्यासंबंधी हा लेख.

१)     नवशिक्षण (New Education)
२)     परम विद्यापीठ (Param University)

) नवशिक्षण :- ज्या पध्दतीत ज्ञान विकास यांचे पोषण सकारण पध्दतीने होते. ते

या प्रक्रियेत खालील गोष्टीचे संबंध असणे सुध्दा गरजेचे आहे.
१)     ज्ञान (pedagogy)
२)     विकास (वैयक्तिक समाजाचा)
३)     ज्ञान संपत्तीची निर्मिती
४)     सूत्रबद्ध पध्दतीने नियोजित उद्दिष्टे गाठण्याची ठोस प्रक्रिया
५)     संस्कृती, सर्जनशीलता उत्तमता यांचे संवर्धन

हे शिक्षण आजच्या काळाची योग्य गरज ओळखून त्याचसाठीअसावे हेच जीवन शिक्षण होय. शिक्षण प्रक्रियेत खालील तीन घटकांचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे.

) विद्यार्थी शिक्षण (शिक्षणाच्या प्रक्रियेत भाग घेणारे कोणीही)
) शिक्षण ज्या वातावरणात घडते ते वातावरण
) ज्यांचा अप्रत्यक्ष लाभ होतो असे समाजातील घटक

वरील नमूद केलेल्या प्रक्रियेतून होणारा विकास या विकासातून होणारे शिक्षण आणि या विकासप्रक्रियेचे शिक्षण हा समवाय इथे अपेक्षित आहे.



अभ्यासक्रम
या नवशिक्षण प्रक्रियेत अभ्यासक्रमात सुद्धा विद्यार्थी समाजाच्या विकासाशी निगडीत असणार आहे.
विद्यार्थ्यांने आपल्या कामाचा मार्ग निवडावा त्यानुसार त्यास शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.

·         आपल्या या कामाच्या क्षेत्रात आपण जी भूमिका बजावत आहोत त्याच्यात विकासाचा टप्पा निश्चित करून त्यासाठी लागणारे शिक्षण घ्यावे.
·         आपल्या विकासासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यातून आपली क्षमता, पात्रता सर्जनशीलता वाढविणे.
·         या सर्व गोष्टीतून आपल्या हातून समाजभिमुख किंवा समाजउपयोगी काम तयार होणे गरजेचे आहे. (Socially usefully Productive Work)

मेटा स्टेट किंवा परम स्टेट
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या उफलब्धतेमुळे जगात निर्माण होणारे सर्व ज्ञान माहिती ही हळूहळू सर्वांसाठी खुली होवू लागली आहे. या माहितीचा एक अथांग सागर तयार झाला आहे. फेसबुक, ट्विटर . सोशल नेटवर्कींग साईटस् मुळे समाज आणखीन जवळ येवू लागला आहे. ज्ञानाची देवाण-घेवाण पण आता सुरू झाली आहे. या उपलब्ध ज्ञानाचा उपयोग लोक आपल्या दैनंदिन जीवनात वापरत आहेत आणि ही प्रक्रिया हळूहळू अत्यंत स्वाभाविक होत आहे.

१)     शिक्षणाचा उद्देश वैयक्तिक सामाजिकआपण रोज वेगवेगळ्या भूमिका करत असतो. या भूमिकेमध्ये आपण परिवर्तन आधुनिकता कशी आणता येईल याचा विचार करावा. आपण आपली भूमिका आणखीन किती योग्य पध्दतीने साकार करू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
२)     स्वतःच्या विकासाचे मार्ग तयार करणे त्यासाठी स्वतः बरोबरच स्वतःच्या परिवाराचा विकास यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
३)     या प्रक्रियेतून तयार होणारी संपत्ती संपत्तीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी जास्तीत जास्त सुयोग्य करणे गरजेचे आहे.
४)     ही प्रक्रिया निरंतर (Life Long) कशी राबविता येईल त्याचा विचार करणे.

शिक्षणातील विकासप्रक्रिया (Development Processes) – शिक्षणातील विकासप्रक्रिया त्यातील टप्प्याची विभागणी खाली नमूद केली आहे.

१)     विद्यार्थ्यांला आपला परिसर आपल्या परिसराविषयी जाणीव निर्माण करणे
२)     ही जाणीव निर्माण झाल्यावर आपल्या तत्कालीन भूमिकेनुसार पुढील शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य जुळविणे किंवा ती जुळविण्यास मदत करणे. (Primary Stake holder).
३)     या प्रक्रियेत सहभागी असणारे प्रत्यक्ष सहभागी (शिक्षण आणि विद्यार्थी सहयोगी) परिवार, परिसर . त्यांचा समन्वय सायबर टेक्नॉलॉजीचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समन्वय घडवून आणणे.
४)     विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक भाग म्हणजे उपक्रम हा शिक्षण प्रक्रियेतून एक प्रमुख टप्पा आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांला समुहात किंवा गटांमध्ये काम करण्याची सवय होते. या उपक्रमांचे प्राथमिक पातळीतील मूल्यमापन सुध्दा या गटांमध्येच होते. सहकार्य सहयोग या दोन गोष्टींची माहिती अत्यंत स्वाभाविकपणे उपक्रमातून होते.
५)     शिक्षण प्रक्रियेत क्षमता सामर्थ्य यांची अधिकाधिक उंची गाठण्यास पोषक वातावरण तयार होवू शकते.
६)     या प्रक्रियेतून निरंतर शिक्षणाचा पाया घातला जातो तशी वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये तयार होते.

नवशिक्षणाचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत.
१)     Open Education Resources – मुक्त शिक्षण स्त्रोत
२)     गटांच्या किंवा छोट्या समूहाच्या सहकार्याने विकासभिमुख शिक्षण
३)     सामुहिक संपत्ती निर्माण त्याचा उपयोग समाजामध्ये अधिक समानता समरसता आणण्यात होईल.

नवशिक्षणातील मूल्यमापन (Role Playing Performance) – आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी या शिक्षण प्रक्रियेत एक विशिष्ट भूमिका साकार करणार आहे. त्या भूमिकेला अनुसरून त्याचे शिक्षण असणे गरजेचे आहे. या भूमिकांवर आधारित त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन करताना खालील गोष्टींचा विचार केला जाणार आहे.

१)     कोर्स / रोल (भूमिका) आधारित किंवा त्याच्या सहभागाची पातळी.
२)     प्रयोगशाळा / कार्यशाळा मधील त्याचा सहभाग.
३)     उपक्रम किंवा प्रकल्पातील सहभाग
४)     विद्यार्थ्यांनी स्वतः घेतलेला पुढाकार (Initiative) त्याचीही नोंद या मूल्यमापनात घेतली जाणार आहे.

आपण सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापनाचा (Continuous Comprehension Evaluation) चा वापर करणार आहेत प्रत्येक शैक्षणिक सत्राच्या आखेर प्रत्येक मुलाखतीवर (viva) आधारित पण मूल्यमापन होणार आहे. अशा मूल्यमापनामुळे पूर्ण सत्रात केलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल त्यातील होणा-या प्रगतीची नोंद घेतली जाईल त्याचबरोबर सुधारणापण सुचविल्या जातील.

१)     e-Portfolio – (प्रत्यक्ष कामाचा पुरावा) – यामध्ये विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेल्या कामाची नोंद त्याचे पुरावे ठेवले जातील.
२)     प्रकल्पातील सहभाग त्यातील कामाची प्रगती याचेपण मूल्यमापन केले जाईल.
३)     वैयक्तिक समुहाच्या कामाच्या पुढाकाराचे पण मूल्यमापन केले जाईल.
४)     स्वतःमध्ये समूहामध्ये काही ठोस बदल घडविण्यास मदत केली असल्यास त्याचीपण नोंद होईल.

·         शैक्षणिक मूल्यमापनविद्यार्थ्यांने मुक्त शिक्षण स्त्रोतात काही शैक्षणिक सहभाग केल्यास त्याची नोंद घेतली जाईल.
·         विद्यार्थ्यांने मुक्त शिक्षण स्त्रोताच्या तंत्रज्ञानामध्ये किंवा त्याच्या विकासामध्ये काही मदत केली असल्यास त्यांची ही नोंद घेतली जाईल.

विकास मूल्यमापन
·         प्रत्यक्ष काही समाजपयोगी गोष्टी किंवा वस्तू तयार केली असल्यास त्याचे मूल्यमापन
·         विकी सारख्या प्रक्रियेत सहभागी असल्यास त्याची नोंद केली जाईल.
·         समाज उपयोगी काही नैसर्गिक संपत्ती तयार केल्यास त्याची नोंद घेतली जाईल.

एकंदरीतच नवशिक्षणाचा उद्देश आधुनिक मूल्यांवर आधारित समाजासाठी संपत्ती तयार करणे हा आहे. शिक्षण आणि विकास यांची दिशा एकच असणार आहे. नवशिक्षणा कामातून ज्ञान आनंद प्राप्त करणे शक्य होईल त्यासाठी लागणारी स्वायत्ता स्वातंत्र देता येणे शक्य आहे.

आधुनिक संगणक तत्रंज्ञान (सायबर स्पेस) – ह्याचा वापर करण्यात येणार असल्यामुळे यांची आकलन प्रक्रियेसपण मदत होणार आहे. स्थानिक जागतिक यातील अंतर कमी होणार आहे याचा लाभ शिक्षणाची नविन उंच गाठण्यास नक्की होणार आहे. The gole of Education is to learn & Develop Continually & strive to rise to higher level of culture & creativity.

) परम विद्यापीठ
परम विद्यापीठ ही व्हर्च्युल (Virtual) शिक्षण संस्था असणार आहे. ही शिक्षणसंस्था जागतिक स्थानिक या दोन्ही स्तरावर असणार आहे त्याच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहे. Cyber Computing मधील झालेल्या क्रांतीमुळे हे आता शक्य आहे.

परम विद्यापीठाचे वेगवेगळे परम कॅम्पसेस अशी कल्पना करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे रेशीम किड्यापासून फुलपाखरू हि प्रक्रिया होते. (Metamorphosis) त्याप्रमाणे शिक्षणाची परिवर्तनाची प्रक्रिया घडावी असा विचार यामध्ये केला आहे.

परम विद्यापीठाची संरचना
१)     e-Pass (e-Platform & Support Services) – प्रत्येक विद्यार्थ्यांस ही सुविधा देण्यात येईल.
२)     Open Education Resource (मुक्त शिक्षण स्त्रोत) – त्यामुळे शिक्षणातील साहित्य सतत नविन (Contemporary) ठेवण्यास मदत होईल.
३)     सोशल नेटवर्कींगचा वापर शिक्षण विकास प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे.
४)     QA & Transform – शिक्षणाचा दर्जा उत्तमता राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
५)     स्वराजस्वनियंत्रण हा परम विद्यापीठाचा पाया असणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक विद्यार्थी -स्पेस (e-Spaces) या क्रियेत सहभागी होवू शकतो.
६)     Resource spaces Open Resources) याचा लाभ घेवून शिक्षण हे जास्तीत जास्त क्न्टेप्ररी होण्यास फायदा होणार आहे.

) Provider Oragnisation – स्वतः नविन शिकलेल्या गोष्टी आपण इतरांना देवू शकतो सामुहिकरित्या त्यातील त्रुटी दूर करून ती अधिकाधिक लोकोपयोगी करू शकतो. (Wikipedia).
) Learner & Development Organisation – शिक्षण विद्यार्थी यांच्या भूमिका सतत बदलत असतात या देवाण-घेवाण प्रक्रियेतूनच समाजविकास होईल असा नविन विश्वास निर्माण झाला आहे.

या प्रकारचा एक पथदर्शी प्रकल्प लवकरच पंढरपूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. Tablet PC चा शिक्षणासाठी वापर National Knowledge Network (NKN) च्या High Power Connectivity मुळे शिक्षण शिक्षण प्रक्रिया हिची देवाण-घेवाण खुप वेगळ्या पातळीवर जाणार आहे.

१)     Distributed Classroom – यामुळे एकाचवेळी अनेक शाळेतील विद्यार्थी एकच विषय एकत्रितरित्या शिकू शकतील. त्यामुळे आधुनिक शिक्षण ग्रामीण भागात सहजरित्या अत्यंत जलदगतीने पोहोचणे शक्य होईल.
२)     Assessment – Tablet PC च्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे मूल्यमापन करणे अधिक सहज होणार आहे ते सातत्यपूर्ण सर्वकश करणे हि शक्य होणार आहे.


या प्रकल्पात डॉ. अनिल काकोडकर, प्रा. राम ताकवले श्री. विवेक सावंत यांचे सतत मार्गदर्शन राहणार आहे. महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनच्या माध्यमातून तो राबविण्यात येत आहे.  



उदय पंचपोर
udayp@mkcl.org



-------   --------

No comments:

Post a Comment