Sunday, March 3, 2013

श्री रामदास स्वामी रचित गणपती वंदना व आरती.


श्री रामदास स्वामी रचित गणपती वंदना व आरती.
ॐ नमोजि गणनायेका| सर्व सिद्धिफळदायेका | अज्ञानभ्रांतिछेदका| बोधरूपा |||| माझिये अंतरीं भरावें| सर्वकाळ वास्तव्य करावें | मज वाग्सुंन्यास वदवावें| कृपाकटाक्षेंकरूनी |||| तुझिये कृपेचेनि बळें| वितुळती भ्रांतीचीं पडळें | आणी विश्वभक्षक काळें| दास्यत्व कीजे ||||

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
 सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची
 जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
 हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।। रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
 जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।।

लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
 दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।
 जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३

No comments:

Post a Comment