Sunday, March 3, 2013

“नवपुणेकर”


आपल्याला “नवपुणेकर” व्हायेचे आहे का? अगदी सोप्पे आहे.

खालील बारा मुद्यावर वर प्रभुत्त्व मिळवा कि झाले तुम्ही “नवपुणेकर”

1.    आपला जन्म इंदोर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मुंबई , नागपूर  इत्यादी ठिकाणी झाला असला पाहीजे.

2.    आपले शिक्षण हे सुद्धा पुण्याच्या बाहेर झाले असले पाहिजे.

3.    आपण “ पुणेरी” पणा वर सतत टीका चालू ठेवली पाहीजे.

4.    पुण्यातील दुकाने व दुकानदार ह्यांची निंदा व नालस्ती हा आपला अधिकार आहे अशा पद्धतीने केली पाहीजे.

5.    पुण्यातील पेठा व पेठेतील राहणारे लोक ह्यांची चेष्ठा चालू ठेवली पाहीजे. पुण्यातील  जुन्या चौकांची नावे बदलणे हा कार्यक्रम चालू ठेवावा. उ.दा.  अप्पा बळवंत चौक ला  ऐबीसी, जंगली महाराज रस्त्याला जे. एम. रोड, फर्गुसन कॉलेज रस्त्याला  एफ.सी रोड. इत्यादी.

6.    पुणेरी मानबिंदू असलेली “पुणेरीपगडी” हिची अवहेलना जितकी शक्य आहे तितकी केली पाहिजे. आपल्या सोफ्टवेअर कंपनी मधील आंतरविभागीय स्पधेतील विजेत्यांना ही पगडी अर्पण करणे चालू ठवले पाहिजे.

7.    बेडेकरांची मिसळ, चितळेबंधू, रामनाथची मिसळ, आप्पाची खिचडी इत्यादी गोष्टी खातखात, आपल्या जन्मगावी कश्या दुधा-तुपाचा राशी आहेत आणि तुम्ही किती भिकार पदार्थ खाता हे सतत सांगत राहिले पाहिजे.

8.    “पुणेरी मराठी” कशी भ्रष्ट होइलं, ह्या साठी प्रयत्न केला पाहिजे’. उ.दा. जसे, ‘ मी तसे केले होते’ असे पूर्ण न बोलता ‘ मी तसे केलेले’ असे बोलणे. रिक्षावाले काका ऐवजी ऑटोवाला असे बोलवायचे.

9.    सिग्नल पाळणे व रांग लावणे म्हंजे मागासले पणाचे लक्षण असे भासवणे व स्वतः मोडावे आणि इतरांना मोडण्यास प्रवृत्त करणे चालू ठेवले पाहिजे.

1. आपल्या वाहनाच क्रमांक MH-12 पासून सुरु होणार नाही ह्याची खबरदारी घेणे जरुरी आहे.

1. आपण जन्मापासून “मॉल” मध्ये खरेदी करतो आहोत आणि तुमचा पेठेतील दुकाने म्हंजे एकदम डाऊन मार्केट कशी आहेत हे सतत सांगत राहणे.

1. पुण्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करणे हा आपला माहितीचा अधिकार प्रमाणे संविधानाने दिलेला अधिकार आहे असे वागणे.
दर महिन्याला एक ह्या प्रमाणे, जर आपण वरील मुद्यांवर प्रभुत्व मिळवत गेलात तर लवकरच “नवपुणेकर” व्हाल.

(पु.ल. देशपांडे ह्यांची क्षमा मागून हे निवेदन सादर केले आहे.)

No comments:

Post a Comment